Home महाराष्ट्र “नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”

“नारायण राणेंच्या दर्शनानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला शिवसैनिकांकडून शुद्धीकरण”

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज आपल्या जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेत अभिवादन केलं. त्यानंतर काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आप्पा पाटील नावाच्या शिवसैनिकाने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून आणि दूधाचा अभिषेक घालून शुद्धीकरण केलं.शुद्धीकरणानंतर तिथं फुल वाहण्यात आली. दुपारी नारायण राणे स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला, असं या शिवसैनिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आज ही वास्तू अपवित्र झाली आहे. त्यामुळे तिथे दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण करण्यात आलं. बाळासाहेबांची फ्रेम पाण्याने धुवून तिच्यावर दुग्धाभिषेक केला आणि बाळासाहेबांना आवडणारी चाफ्याची फुलं वाहण्यात आलीत. राणेंना इतके दिवस शिवसेना दिसली नाही. सेनेला सोडून गेल्यानंतर त्यांना बाळासाहेब दिसले नाहीत, असा हल्लाबोल आप्पा पाटील यांनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

आमदार गोपीचंद पडळकरांना अटक करून दाखवाच, मग आम्ही दाखवू की…; सदाभाऊ खोतांचा सरकारला इशारा

‘आधी केलेले पाप धुवा, मगच आशीर्वाद मागा’; जन आशीर्वाद यात्रेवरुन राष्ट्रवादीची टीका

‘भाजप नेत्यांना त्यांच्या काळातील वसुली आठवत असेल’; मुख्यमंत्र्यांवरील टीकेला अब्दुल सत्तारांचं प्रत्युत्तर

भिवंडीत काँग्रेसला खिंडार! ‘या’ माजी शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश; 10 नगरसेवकही लवकरच करणार पक्षप्रवेश