Home महाराष्ट्र “मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”

“मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”

मुंबई : आजपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरूवात केली आहे. मुंबई विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केल्यानंतर या यात्रेला सुरुवात झाली. यानंतर नारायण राणे तसेच इतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांना संकट मोचन हे नावं दिलं गेलं आहे. अनेक संकटं येत आहेत, तरीही ते उत्कृष्ट काम करत आहेत. देशातील अनेक नेते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून स्तुती करत आहेत. तसंच इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या शिवसंपर्क अभियानामुळेच भाजपच्या नेत्यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली, असा आरोपही सत्तारांनी यावेळी केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस

“…तर मी त्याच्यासोबत झोपेन; हत्या प्रकरणेबाबत ‘या’ अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गाडीवर दगडफे

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…