Home पुणे 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस

2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस

पुणे : पुणे जिल्ह्यातील 15 वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून राहिलेल्या आशा बुचके यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यश चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यावेळी देवेन्द्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.

भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तीन पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केली. मात्र यामुळे त्या पक्षांचा अवकाश कमी होऊन श्वास कोंडला आहे. तर दुसरीकडे भाजपाला संपूर्ण राज्यभर मोकळ्या श्वासाने काम करून पक्ष विस्ताराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेवर येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रात मोकळ्या श्वासाने पक्षाचे काम करू आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर भाजपाला सत्तेवर आणू, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर मी त्याच्यासोबत झोपेन; हत्या प्रकरणेबाबत ‘या’ अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गाडीवर दगडफे

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

आता उद्धवचा काळ संपला, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार- नारायण राणे