मुंबई : आजपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. नारायण राणे आज मुंबईमध्ये जनतेचा आशीर्वाद मागत आहेत. सकाळी 11 वाजता त्यांचं मुंबई विमानताळवर आगमन झालं. नंतर मुंबईतल्या पहिल्या भाषणात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला उध्वस्त करायला निघालेत. आपल्याला आपलं राज्य वाचवाचयं, पुन्हा भाजपचं सरकार आणायचंय, राज्य उद्धवस्त करणाऱ्यांना सत्तेतून खाली खेचायचंय, असा हल्लाबोल नारायण राणेंनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील सरकारने गेल्या अडीच वर्षात कोणताही विकास केलेला नाही. उद्धव ठाकरे हे राज्याला उद्वस्त करत आहेत. आता हे सरकार हटविण्याची वेळ आली आहे. या सरकारचा काळ आता संपला आहे, महाराष्ट्रात पुन्हा भाजपचं सरकार येणार, असा दावा राणेंनी यावेळी केला.
दरम्यान, मला मिळालेलं पद हे जनतेचं पद आहे. केंद्रात मंत्री झाल्यानंतर वेगळा अनुभव घेता आला. महाराष्ट्राचं नाव देशात केल्याशिवाय राहणार नाही, असंही राणेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुस्लिम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात…; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य
“आदित्य ठाकरेंना भेटलेला पुण्यातील अफगाण विद्यार्थी संकटात, तालिबानकडून कुटूंबाचा शोध सुरू”
गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं; रावसाहेब दानवेंचा अब्दुल सत्तारांना टोला