मुंबई : सोमवारी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झालेली आहे. ठाण्यातून रवाना झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप कल्याण येथील आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात करण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर मंत्र्यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या जन आशीर्वाद यात्रेत भाजपच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवलीत एकूण चार गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल केले गेले आहेत.
कल्याणच्या खडकपाडा, महात्मा फुले, कोळसेवाडी आणि डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणी डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर, नंदकिशोर परब, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह पाच जणांविरुद्ध त्याचप्रमाणे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”
“मोठी बातमी! नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वगळला, चर्चांना उधाण”
उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांच्या यादीत; प्रविण दरेकरांची टीका, म्हणाले…
शिवसेना म्हणजे खंडणी सेना आणि ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार- किरीट सोमय्या