Home पुणे “देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

“देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं दिल्लीतील वजन वापरून, बैलगाडी शर्यतीचा प्रश्न मार्गी लावावा”

पुणे : कायद्यानुसार महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास बंदी आहे. मात्र बैलगाडा मालकांनी शर्यत सुरू करण्यासाठी आंदोलने केली आहेत. यातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत.

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले. या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे आता बैलगाडा शर्यतीचे प्रयत्न पहिल्यापासुन करावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांची भेट घेतली. या भेटीत अमोल कोल्हेंनी बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतुन वगळावा, अशी मागणी केली.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यासंदर्भात बैलगाडा शर्यती संघटनेच्या अध्यक्षांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस यांचं दिल्लीत चांगलं वजन आहे. त्यांनी पक्षभेद बाजूला ठेऊन त्यांनी आमच्यासोबत पुरूषोत्तम रूपाला यांच्याकडे यावं. तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी फडणवीसांनी संबंधित मंत्र्यासोबत चर्चा करुन मार्ग काढावा, असं अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! नारायण राणेंच्या जनआशिर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ वगळला, चर्चांना उधाण”

उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्यांच्या यादीत; प्रविण दरेकरांची टीका, म्हणाले…

शिवसेना म्हणजे खंडणी सेना आणि ठाकरे सरकार म्हणजे वसुली सरकार- किरीट सोमय्या

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचं जगणं मुश्किल झालं; काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा घणाघात