मुंबई : अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत.
यानंतर आज राज्यातील काही अफगाणी विद्यार्थ्यांनी राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली व त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीविषयी माहिती दिली.
काहीजण असे देखील आहेत, ज्यांच्याकडे पुढील 2 वर्षांसाठीचा व्हिसा देखील आहे आणि अभ्यास करण्याची संधी आहे. तर, काहीजण असे देखील आहेत की, आता त्यांच्या व्हिसाची मुदत संपत आलेली आहे व त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पदवी पूर्ण होत आलेली आहे, तर त्यांना देखील चिंता आहे की ते परत कसे जाणार? त्यांचं जे काही म्हणणं होतं, ते मी ऐकलं आहे आणि ते सगळं केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम करत आहे., असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात साधारण साडेतीन ते चार हजार मुलं, मुली अफगाणिस्तानची आहेत. मी त्यांना हे सांगितलं की, जोपर्यंत तुम्ही या राज्यात आहात, तोपर्यंत मनात कुठलीही भीती बाळगू नका. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या केंद्र सरकारकडे पोहचवल्या जातील. यामध्ये राज्याला फार अधिकार नाहीत, परंतु त्यांचं ऐकणं गरजेचं होतं, त्यांना हे सांगणं आवश्यक होतं की, इथं ते सुरक्षित आहेत आणि कोणताही त्रास त्यांना इथं दिला जाणार नाही., असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधले; चंद्रशेखर बावनकुळेंचे पवारांना प्रत्युत्तर
भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले
“मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उद्यनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”
पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा सवाल