पुणे : अफगाणिस्तान देशाला तालिबान्यांनी ताब्यात घेतलं असून अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी देश सोडून गेले आहेत. त्यामुळे तेथील परिस्थिती चिघळली आहे. तसेच अफगाणिस्तानमधील नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडून जाताना दिसत आहेत.
पुण्यामध्येही काही अफगाणिस्तानचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. असाच एक, मोहम्मद अहमदी नावाचा विद्यार्थी आहे. तो मूळचा अफगाणिस्तानचा असून सध्या तो पुण्यात राहतो. त्याचे आई-वडील अफगाणिस्तानातील काबूल शहरात अडकले आहेत. आपल्या आई-वडिलांच्या सुटकेसाठी त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे विनवणी केली आहे. तो टी.व्ही.9 मराठीशी बोलत होता.
माझे आई-वडील अफगाणिस्तानच्या काबूल शहरात अडकले आहेत. तिकडची परिस्थिती खूप खराब आहे. दोन दिवसांपूर्वी माझं आई वडिलांशी 5 मिनिटं बोलणं झालं होतं, ते सध्या सुरक्षित आहेत. मी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार असून, महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारने मला मदत करावी, अशी विनवणी मोहम्मद अहमदीने यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
मोदी नसते तर आज भारताची अवस्थाही अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा रणाैत
मराठा आरक्षणाबाबत अपयश लपविण्यासाठी शरद पवार यांनी…; चंद्रकांत पाटलांची टीका
पुणे जिल्ह्यात शिवसेनेला धक्का; शिवसेनेच्या ‘या’ आक्रमक महिला नेत्या लवकरच भाजपात!
सात कशाला, हीच पिढी शिवसेनेला संपवेल; निलेश राणेंचं प्रत्युत्तर