Home महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार; शिक्षणमंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे :  राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होणार, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. ते पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविद्यालयं सुरू करावेत, यासाठी आमची देखील तयारी झालेली आहे. किती टक्क्यांमध्ये सुरू करायची? आणि कशा पद्धतीने करायची? या संदर्भात प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. केवळ टास्क फोर्सने जे परवा सांगितलं आहे, की पुन्हा एकदा महाविद्यालयं किंवा शाळा सुरू करणं हे तिसऱ्या लाटेच्यादृष्टीने अडचणीचं होऊ शकतं. तर हे सगळे अहवाल आम्ही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे नेऊ, टास्क फोर्सशी चर्चा करू. पण महाराष्ट्र शासनाची तयारी महाविद्यालयं सुरू करण्याची झालेली आहे., असं उदय सामंत यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, प्रत्येक ठिकाणी कुलगुरू जिल्हाधिकाऱ्यांशी, आमच्या संचालकांशी बोलत आहेत. लवकरात लवकर आम्ही महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांची ‘या’ कारणासाठी होणार चाैकशी”

ओबीसींच्या हक्कासाठी कौटुंबिक संबंध बाजूला ठेवून लढायलाही तयार; पंकजा मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मनसे नेत्याच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?; चित्रा वाघ यांनी केला संताप व्यक्त

“नितीन गडकरी हे ‘विकासपुरूष, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य कारवाई करतील”