लातूर : ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला. लातूरमध्ये आज ओबीसी मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मला पंतप्रधान मोदींकडं, शरद पवारांकडं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेकडं जावं लागलं तरी मी जाईन किंवा समाजासाठी मला कमरेतून झुकून कोणी नमस्कार करा असं म्हटलं तरी मी तो करेन, पण आरक्षणासाठी काहीही’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
कौटुंबिक संबंध म्हणून मी उद्धव ठाकरेंचा आदर करते, मात्र ओबीसींच्या हक्कासाठी ते मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याशी लढायलाही मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडेंनी यावेळी उद्धव ठाकरेंना दिला.
ओबीसींचं आरक्षण वाचवा, अन्यथा उद्रेक होईल. मुंबईत 10 लाखांचा मोर्चा काढण्याची वेळ आणू नका. ओबीसी आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका. आमचा मराठा आरक्षणालाही पाठिंबा आहे. हे मेळावे फक्त मेळावे नाही राहिले पाहिजे. तर यातून काही सिद्ध झालं पाहिजे. लातूरमध्ये एक लाख काय…मुंबईत 10 लाख लोकं येऊ शकतात. आम्हाला त्याची बिलकुल चिंता नाही. तो ही एक दिवस येईल. ओबीसी शांत आहे, ओबीसी भोळा आहे, पण त्यालाही तिसरा डोळा आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे नेत्याच्या पत्नीवर सेटलमेंटसाठी दबाव?; चित्रा वाघ यांनी केला संताप व्यक्त
“नितीन गडकरी हे ‘विकासपुरूष, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य कारवाई करतील”
“चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”
…तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल