मुंबई : मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात गंभीर आरोप केले आहे. यासंदर्भात संजीवनी काळेंनी एक व्हिडीओ शेअर केलाय. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केलाय.
हे काय चाललयं राज्यात, आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ? गुन्हा नोंद होऊनही नवी मुंबई पोलीस कार्यवाही का करत नाहीत? कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगत आहेत? उत्तर द्या”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरमयान, चित्रा वाघ यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करुन मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्र पोलीस यांना टॅग करत प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे काय चाललयं राज्यात @CMOMaharashtra @maharashtra_hmo आपण पोलिसांना गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीवर कारवाई न करता सेटलमेंट करा असे आदेश दिलेत का ??@DGPMaharashtra गुन्हा नोंद होऊनही @Navimumpolice कार्यवाही का करत नाहीत कुठल्या अधिकारात सेटलमेंट करण्यास सांगताहेत ??
उत्तर द्या pic.twitter.com/7LjN9i0inZ— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 14, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“नितीन गडकरी हे ‘विकासपुरूष, त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मुख्यमंत्री योग्य कारवाई करतील”
“चिक्कीताई म्हणणाऱ्यांना पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या…”
…तेंव्हा गडकरींना शिवसेना कशी काम करते माहीत नव्हतं का?; नाना पटोलेंचा सवाल
शिवसेना-भाजप युती संदर्भात संजय राऊतांशी चर्चा; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट