Home महाराष्ट्र राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत

राज्यपालांवर दबाव, त्यांनी प्यादं बनू नये- संजय राऊत

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मागील आठ महिन्यांपासून 12 विधान परिषद आमदारांची यादी आपल्याकडेच राखून ठेववली होती, त्यांना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवता येणार नसल्याची भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने मांडली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संजय राऊत यांनी भगतसिंग कोश्यारी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे. राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाहीत, त्यांच्यावर दबाव आहे, तो दबाव कोठून असू शकतो हे आपल्याला माहिती आहे, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारकडे बोट दाखवलं.

दरम्यान, राज्यपालांनी राजकारणातलं प्यादं बनू नये, राज्यांच्या अधिकारावर, कॅबिनेटच्या अधिकारावर जर ते अतिक्रमण करत असतील, तर देशाच्या अधिकारांवर संघराज्यवर हल्ला आहे. 12 आमदारांबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे, असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनो बाजूला व्हा; फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजित पवारांनी खडसावलं

“11 वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करता शेवटचा अर्ज”

संविधान व देशाला वाचविण्यासाठी काँग्रेस पक्षच सक्षम पर्याय – नाना पटोले

प्रवीण दरेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधान