मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 20 मिनिटे बंद चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज मार्मिक वर्धापनदिन सोहळा मुंबईत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकर यांच्यामार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे.
दरम्यान, प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
हे आमच्या घटनेचे दुर्दैव; संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
तुमच्यामुळं जबाबदारी मिळाली आहे, मी जबाबदारीतनं पळणारा नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अगर आप करते रहोंगे हाऊस मे दंगा, तो कर देंगे एकदिन आपको नंगा; आठवलेंचा कविता शैलीत विरोधकांना इशारा
कराड यांची ‘जनआशीर्वाद यात्रा’ गोपीनाथगडावरून निघणार; पंकजा मुंडे दाखवणार हिरवा झेंडा