मुंबई : 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शाळा कधी सुरु होणार याबाबत आधीची पालक वर्गात कमालीचा संभ्रम आहे. या संभ्रमध्ये भर पाडण्याचे काम सरकार कडून होत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला. तसेच सर्वांनी एकत्रीत बसून सरसकट एकच निर्णय जाहीर करावा, जेणेकरून पालकांमधील संभ्रमावस्था दूर होईल, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी म्हटलं. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, सदर उपक्रमाचा लोकार्पण सोहळ्या दरम्यान गरजू विद्यार्थांना अभ्यास करण्यासाठी मोबाईल फोन देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत देखील देण्यात आले.
महत्वाच्या घडामोडी –
नागपुरात शिवसेनेचा भाजपला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
“आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”
रावसाहेब दानवेंनी रूग्णालयात बसून पैसे वाटले, म्हणून माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गाैफ्यस्फोट
संभाजीराजेंना बोलू द्या; संजय राऊत राज्यसभेत भडकले