Home देश “आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”

“आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”

नवी दिल्ली : काल राज्यसभेत 127 वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं गेलं. यावर तब्बल 6 तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यसभेच्या पटलावर विमा संरक्षण विधेयक आणलं गेलं अन् गोंधळ झाला.

राज्यसभेत इन्श्यूरन्स बिल जबरदस्तीने मंजूर केलं जात होतं. त्याला विरोध केल्याने बाहेरून मार्शलला बोलावण्यात आलं. यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी वेलमध्ये येऊन कागद फाडले. त्यांना रोखण्यासाठी महिला बाऊंसर बोलवल्या गेल्या. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

ईएसबीसी आरक्षण बिलावेळी सर्वांनी मदत केली पण अचानक हे इंन्शुरन्स बिल पटलावर का आणलं गेलं. विमा कंपन्यांचं खाजगीकरण हे देशाला मान्य नाही पण सभागृह नेते पियुष गोयल यांनी हे बिल रेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा सर्वांनी याला विरोध केला. हे करत असताना आम्हाला अडवण्यासाठी महिला बाऊंसर बोलवल्या गेल्या आणि आमची कोंडी केली गेली. ही तुमची कसली मर्दानगी आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारचा निषेध केला.

दरम्यान, मार्शल बोलवणं ही काय नवी गोष्ट नाही, पण मर्यादा असतात की नाही. प्रताप बाजवा यांनी रुल बुक फेकलं ते योग्यच होतं. सरकार जर नियम मोडत असेल तर हे घडणारच होतं. विमा विधेयकाला विरोध करताना मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार हे पण उभे राहिले पण सरकारने विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम केलं आहे., असं संजय राऊतांनी म्हटलं. तसेच शिवसेनेचे खासदार कधी वेलमध्ये जात नाहीत पण काल अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी वेलमध्ये गेले कारण सरकार त्यांचं म्हणणं नव्हतं ऐकत. हे खासदार लोकहितासाठी भांडत होते. तुम्हाला त्यांच्यासमोर महिला बाऊंसर आणताना लाज नाही का वाटली, असा संतापजनक सवालही संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी –

रावसाहेब दानवेंनी रूग्णालयात बसून पैसे वाटले, म्हणून माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गाैफ्यस्फोट

संभाजीराजेंना बोलू द्या; संजय राऊत राज्यसभेत भडकले

“रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या बँकेला ईडीची नोटीस”

मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा निर्णय