नवी दिल्ली : राज्य सरकारांना एखाद्या समाजास आरक्षण देण्याचा अधिकार देणारे विधेयक मंगळवारी लोकसभेत आणि बुधवारी राज्यसभेत विधेयक पारित झाले. या विधेयकावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा झाली. यावेळी मराठा आरक्षणाच्या चर्चेत, राज्यात हा मुद्दा लावून धरणारे संभाजीराजे यांना बोलण्याची परवानगी मिळाली नव्हती.
शिवसेना खासदार संजय राऊत बोलण्यासाठी उभे राहिलेत आणि, संभाजीराजे याना बोलू द्या, अशी मागणी सभापतींकडे केली. नंतर शिवसेना खासदारांनीही त्यांना बोलू देण्याचा आग्रह धरला. संजय राऊत आणि शिवसेना खासदारांच्या आग्रहानंतर सभापतींनी संभाजीराजे यांना संसदेत मुद्दा मांडू दिला.
संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहेत. ज्यांनी देशात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. त्यांना 2 मिनिट तरी बोलू द्या,असं संजय राऊत म्हणाले.
संभाजी राजे यांना दोन मिनिटांचा वेळ मिळाला. संभाजीराजे यांनी राज्यसभेत विधेयकात 2 सुधारणा सुचवल्या. राज्यसभेत विधेयक पारित झाले आणि राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, संसदेत बोलू दिल्याबद्दल संभाजीराजे यांनी ट्विट करून संजय राऊतायांचे आभार मानले.
१२७ व्या घटनादुरूस्तीवर आपले मत मांडत असताना @rautsanjay61 यांनी देशाचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या राज्यसभेत, माझ्या मराठा आरक्षण लढ्यातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. तसेच या विधेयकावर माझे मत ऐकून घ्यावे, यासाठी सभापतींकडे जोरदार आग्रह धरला. pic.twitter.com/eNfyykAhMZ
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 11, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“रोहिणी खडसे अध्यक्षा असलेल्या बँकेला ईडीची नोटीस”
मोठी बातमी! 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक; राज्य सरकारचा निर्णय
‘अश्लिल व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ, भाजपचा ‘हा’ मोठा नेता अडचणीत”
…तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक