मुंबई : नवीन कुठलीही योजना न आणता जुन्या योजनांची केवळ नाव बदलली जाताहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत, असं म्हणत काँग्रेस नेते व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मोदी सरकारला टोला लगावला.
महाविकास आघाडी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. यावर बोलत असताना अस्लम शेख यांनी मोदी सरकारला टोला लगावला.
राजीव गांधी यांनी देशात नवीन टेक्नॉलॉजी आणली. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यांचं नाव काढत आहेत. त्यामुळं हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. जेवढे ते नाव संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढं त्यांचं नाव वरती येत राहील, असंही अस्लम शेख यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘या’ माजी प्रदेश उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल”
संजय राऊतांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की, त्या सगळ्या बाटल्या त्यांनीच रिकाम्या केल्या- निलेश राणे
“आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का?”