“मविआला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे”

0
177

मुंबई : कोरोनाच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी या कामाचं विशेष कौतुक केलं. मात्र एवढं चांगलं काम केलं तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावं, कारण विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे आहेत, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

श्रीमान संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत! पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत., असा टोमणा दरेकरांनी यावेळी लगावला.

महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे ?आश्चर्य आहे! , असा हल्लाबोल दरेकरांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करा”

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक

“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”

एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here