Home महाराष्ट्र मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब- सुधीर मुनगंटीवार

मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडणं ही शरमेची बाब- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या मंत्रालयातून राज्य कारभार चालविण्याची शपथ घेतली जाते, त्या मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडणे ही राज्यकर्त्यांसाठी अत्यंत शरमेची बाब आहे. राज्य सरकारचे एकूण धोरण पाहता आघाडी सरकारला महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र बनविण्याची घाई झालेली आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

आघाडी सरकारने मागील आर्थिक वर्षांत मद्य विक्रेत्यांचे परवाना शुल्क माफ केले. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली. आता किराणा दुकानात बिअर आणि वाईन विक्रीला परवानगी देण्याचा विचार आघाडी सरकार करत आहे. मद्य घेणारे आणि मद्य विक्रेते यांच्या आधारावरच राज्याची अर्थव्यवस्था टिकून आहे असा समज आघाडी सरकारने करून घेतल्याचे दिसत आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर मग काय…; निलेश राणेंचा घणाघात

ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर मग काय…; निलेश राणेंचा घणाघात

महाराष्ट्रातील आरोग्यपूजक हरपले; जयंत पाटलांकडून बालाजी तांबेंना श्रद्धांजली अर्पण

“…तेव्हा का नाही एनडीएतून बाहेर पडलात?”; प्रितम मुंडेंचा सवाल