Home महाराष्ट्र राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी बोललो; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीबाबत जेपी नड्डांशी बोललो; चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत भेट झाली नाही. त्यामुळे मनसे आणि भाजप युतीचा प्रश्न लटकल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू होती. मात्र, नंतर काही तासातच भाजपाचे पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाचे संघटन प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची त्यांना माहिती दिल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजप-मनसे ‘युती’ची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोष यांना दिली. राज यांच्यासोबतची भेट भूमिका समजून घेण्यासाठी होती व त्यामध्ये दोन्ही पक्षांच्या युतीचा प्रस्ताव नव्हता, असे केंद्रीय नेतृत्वाला सांगितले. त्यावर आमच्या नेतृत्वाने ‘ठीक है’ एवढीच प्रतिक्रिया दिली, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, चार दिवसांचा दिल्ली दौरा आटोपून आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी –

महाराष्ट्रातील आरोग्यपूजक हरपले; जयंत पाटलांकडून बालाजी तांबेंना श्रद्धांजली अर्पण

“…तेव्हा का नाही एनडीएतून बाहेर पडलात?”; प्रितम मुंडेंचा सवाल

मुख्यमंत्री गेले दीड वर्ष मंत्रालयात न गेल्याने…; चित्रा वाघ भडकल्या

…मग हा टाइमपास कशाला? निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंना सवाल