पुणे : मराठा आरक्षणावरून आंदोलन पुकारणारे खासदार संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचा इशारा दिला आहे. आता पुन्हा मूक आंदोलन नांदेडवरून होणार असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं आहे. ते पुण्यामधील मराठा क्रांती मोर्चा बैठकीमध्ये बोलत होते.
“आपण ही लढाई संयमाने लढत असल्याचे अधोरेखित करताना दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटवू शकतो, पण आपल्याला ते करायचे नाही. मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची भूमिका ही समांजस्याची आहे.” असं संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
वर्षानुवर्षे जे लोक एकमेकांची तोंडं पाहत नव्हते, ते आज या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. आपल्याला अशाच एकजुटीने लढायचे आहे. मराठा समाजाला न्याय मिळून द्यायाचा आहे, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
तुम्ही मंत्रालयात बसून काम करण्यासाठी याचि
“देशाला 2014 पासून ग्रहण लागलंय, स्वातंत्र्यलढ्यात योगदान नाही असे लोक आज सत्तेत आहेत”
लोकल सुरू करण्याबाबत दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही- संजय राऊत
“ठाकरे सरकारला आरक्षणच द्यायचे नाही, त्यामुळे…”