मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहिती आहे. अशातच वैर बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या मित्राला राज्य मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे.
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्याच्या सहकार परिषदेवर अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे अनास्कर यांना आता राज्य मंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे.
अनास्कर हे उच्चशिक्षित असून, गेल्या 30 वर्षांपासून राज्याच्या सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. अनास्कर यांनी सहकार क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. अनास्कर हे सध्या सहकारी बँकेवर प्रशासक आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची राज्य सहकारी बँकेवर प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. राज्यातील सरकार बदलल्यानंतरही महाविकास आघाडी सरकारनं त्यांना प्रशासक म्हणून कायम ठेवलं.
महत्वाच्या घडामोडी –
जाऊ तिथं खाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं सुरू आहे- सदाभाऊ खोत
“…त्यामुळे पंकजा मुंडेंच्या डोळ्यात अश्रू आले; त्यांच्या डोळ्यातील अश्रू आपल्याला समजले पाहिजे”
आमच्या नेत्यांवर बोलाल तर…; नितेश राणेंचा संजय राऊतांवर निशाणा
2024 ला आमचं एकच इंजिन असणार; युतीबाबत फडणवीसांचं मोठं विधान