मुंबई : देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराचे नाव बदलण्यात आले आहे. खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव देण्यात आले आहे. यासाठी देशभरातून लोकांच्या विनंत्या येत होत्या त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मोदींना टोला लगावला आहे.
“जनतेची मागणी होती म्हणून नरेंद्र मोदींनी खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदलले, हे चांगल आहे पण जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत. यामध्ये महागाई कमी करा, युवकांना रोजगार द्या, महिलांना सुरक्षा द्या, शेतकऱ्यांना सन्मान द्या आणि राजीनामा द्या”,असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
“जनतेची मागणी” म्हणून खेलरत्न पुरस्कारांचं नाव बदललं म्हणे… चांगलं आहे.
जनतेच्या अजूनही काही छोट्या छोट्या मागण्या आहेत
१- महागाई कमी करा
२- युवकांना रोजगार द्या
३- महिलांना सुरक्षा द्या
४- शेतकऱ्यांना सन्मान द्या
५- राजीनामा द्या— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर…; चंद्रकांत पाटलांचे संजय राऊतांना आव्हान
लोकल प्रवास नाकारणारे हे तर जनविरोधी ठाकरे सरकार; कांदिवलीत भातखळकरांचं रेलभरो आंदोलन
“माझ्या मनातील प्रश्न मी राज ठाकरेंसमोर मांडले, युतीचा कोणताही प्रस्ताव भेटीत मांडला नाही”
भविष्यात मनसे-भाजप एकत्र येणार असेल तर आनंदच आहे- बाळा नांदगावकर