Home क्रीडा ” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने...

” हाॅकीत ऑलिम्पिकमध्ये भारताला तब्बल 41 वर्षानंतर पदक; भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय”

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने जर्मनीवर 5-4 असा विजय मिळवत तब्बल 41 वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी खेळात पदक जिंकलं आहे.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गोल करत जर्मनीने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. पहिल्या क्वार्टरनंतर जर्मनीला 1-0 ने आघाडी मिळाली. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनी आघाडीवर होती. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या सिमरनजीतने 1 गोल करत सामन्यात बरोबरी केली. पण नंतर पुन्हा जर्मनीने 2 गोल करत आघाडी घेतली. त्यामुळे जर्मनी 3-1 ची आघाडी घेतली. भारताने जिद्द न सोडता आपला खेळ दिमाखात सुरु ठेवला. भारताच्या हार्दिक सिंगने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत जर्मनीची आघाडी कमी केली. तसंच हरमनप्रीतने पुन्हा गोल करत जर्मनीशी बरोबरी केली. त्यामुळे आता दोन्ही संघ 3-3 ने बरोबरीत होते.

तिसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या 29 व्या मिनिटाला भारताच्या रुपिंदर सिंगने गोल केला. परत लगेचच 5 मिनिटांनी सिमरनजीतने गोल करुन भारताला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे भारत आता 5-3 ने आघाडीवर होता. त्यानंतर जर्मनीने एक गोल करत रंगत आणली. जर्मनीने पेनल्टी कॉर्नर मिळवले पण त्याचं गोलमध्ये रुपांतर करण्यास अपयश आलं आणि अशा प्रकारे भारताने हा सामना 5-4 ने जिंकत तब्बल 41 वर्षांनी हाॅकीत इतिहास घडवला.

महत्वाच्या घडामोडी –

जिथं सत्ता नाही, तिथं भाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवतंय- संजय राऊत

“मनसे असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप त्यांच्याशी युती करणारच नाही”

“शिवसेनेत घेतले नाही म्हणून चित्रा वाघ यांचा जळफळाट”

शरद पवारांचं अमित शहांना पुणे भेटीचं निमंत्रण; पुन्हा चर्चांना उधान