मुंबई : मुंबईत भाजपला संपवण्याची तयारी आजपासून सुरू झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ते मुंबईत पक्ष मेळाव्यात बोलत होते.
सांस्कृतिक राजधानी उद्ध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजूला करण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. समाजात आग लावण्याचे काम करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा, असं शरद पवार म्हणाले.
मुंबईत पक्षसंघटना आणखी मजबूत करण्यासाठी नव्या लोकांना संधी दिली पाहिजे. भाकरी फिरवली नाही, तर ती करपते. याचा विचार करुन पक्षबांधणी करावी लागते, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जी शक्ती देशाच्या एक्याला धक्का लावत आहे, त्यांना खड्यासारखे दूर करणे गरजेचं आहे. जाती-धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्यांना सत्तेतून घालवण्यासाठी राष्ट्रवादी अग्रभागी असेल, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी-
कुत्रा पिसळतो तसा हा पिसळलाय; निलेश राणेंची विनायक राऊतांवर आक्षेपार्ह टीका
भाजपचे दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले; शिवसेनेची चंद्रकांत पाटलांवर टीका
शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार
“आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, पण…”