मुंबई : राज्य सरकारने एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात अर्ज मागवले होते. त्याची छाननी करण्यात आली आणि तीन नावं निश्चत करून राज्यपालांकडे पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता तो विषय सरकारकडे नाही राज्यापालांकडे प्रलंबित आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हटलं आहे.
राज्य सरकारने 31 जुलैच्या तीन दिवस अगोदर या संदर्भात निर्णय करून तीन नावं निश्चित केली आणि ती अंतिम निर्णयासाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. अपेक्षा आहे की लवकरात लवकर राज्यपाल महोदय त्यावर स्वाक्षरी करून, ते शासनाला पाठवतील. जेणेकरून त्या नियुक्त्या होतील आणि व्यस्थितरित्या एमपीएससीचं कामकाज चालेल. त्यामुळे आता तो विषय सरकारकडे नाही राज्यापालांकडे प्रलंबित आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
राज्य सरकारने एमपीएससीच्या तीन सदस्यांच्या नेमणुकीसंदर्भात अर्ज मागवून, तीन नावांची निश्चिती करुन ती नावे राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवली आहेत. राज्यपाल महोदयांनी लवकरात लवकर प्रस्तावावर हस्ताक्षर करुन सरकारकडे पाठवावे, जेणेकरुन एमपीएससीचे कामकाज लवकर सुरु होईल – @nawabmalikncp pic.twitter.com/SRsycs9odc
— NCP (@NCPspeaks) August 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
दिलेला शब्द पाळणारा अजित पवारांसारखा दुसरा नाही, पण…; चंद्रकांत पाटलांचा टोला
“नारायण राणेंनी शिवसेना सोडली, तेंव्हा संजय राऊत बाथरूममध्ये लपले होते”
राज ठाकरे हे माझे आवडते राजकीय व्यक्तिमत्व, लवकरच त्यांची भेट घेणार- चंद्रकांत पाटील
मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याला जेवढा खर्च, कोकणातील पूरग्रस्तांना तेवढीही मदत नाही; निलेश राणेंची टीका