Home महाराष्ट्र “उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”

अमरावती : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या मागे पनवती लागली आहे, असं म्हणत अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. ‘करोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात, करोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू कुठं असतील तर महाराष्ट्रात, कोकणात चक्रीवादळ आलं. पूर आला. अनेक गावं बुडाली. घरं बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आलं. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं. शेतकरी आत्महत्या करताहेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात विदर्भ सुद्धा आहे. विदर्भात शेतकरी आत्महत्याच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे . शिवाय अमरावतीत कोरोनाचे संकटही आहे. कोरोनाची दुसरी लाट अमरावतीतून सुरू झाली. संपूर्ण देशात अमरावतीचं नाव पोहोचलं. तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकलं नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडं बेशरम म्हणतात. त्यामुळे ‘मातोश्री’वर बेशरमेचे झाड लावावे लागेल, असंही रवी राणा म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम आमच्याच काळातलं; देवेंद्र फडणवीसांचा दावा

दादा…….क्या हुवा तेरा वादा; चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला

“मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत तिसरं पदक; पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक