मुंबई : मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा उद्घाटन सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत पार पडला. तसेच या चाळीच्या पुनर्वसनातुन 9 हजार 394 निवासी सदनिका बांधण्यात येणार असून यामध्ये नागरिकांना जीम, शाळा व रूग्णालय इत्यादींसाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा संपूर्ण आराखडा तयार करून, सर्व प्रकारच्या परवानगी घेऊन, त्याच्या निविदा काढून कार्यादेश (वर्क ऑर्डर) सुद्धा आमच्या काळात दिले होते आणि भूमिपूजन सुद्धा झाले होते., असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे., असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
आता तेच काम दीड वर्षांचा विलंब करून पुन्हा सुरू होते आहे. त्याचे भूमिपूजन होते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. मराठी माणसाला हक्काचे मोठे घर देण्याचा आमचा संकल्प पुन्हा पुढे जाणार याचा आनंद आहे.#BDDChawl #Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
दादा…….क्या हुवा तेरा वादा; चित्रा वाघ यांचा अजित पवारांना टोला
“मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत तिसरं पदक; पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”