मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे पूर आलेल्या भागांची पहाणी केली. सुमारे 26 ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पूरग्रस्तांशी चर्चा केल्या. यानंतर मदतीसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांबाबत आपल्या सविस्तर मागण्यांसंबंधी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत स्थानिक नेत्यांना घेऊन पूरग्रस्त भागांचा दौरा केला. पीडितांशी चर्चा केली त्यानंतर पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही प्रकारच्या सूचना करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले.
दरम्यान, या दौऱ्यात कोल्हापूर येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली होती, या भेटीनंतर दोन दिवसांनी देवेंद्र फडणवीसांनी हे पत्र लिहिलं आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा माझे सहकारी प्रवीण दरेकर @mipravindarekar यांच्यासमवेत दौरा करून, पूरग्रस्तांच्या व्यथा आणि गरजा समजून घेतल्यानंतर, तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांना पत्र! #MaharashtraFloods pic.twitter.com/XjAZZbZDau
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
प्रसाद लाड म्हणाले, वेळ आली तर शिवसेना भवन फोडू; संजय राऊत म्हणतात…
“केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”
“राज्यातील बारावी परीक्षांचा निकाल उद्या 2 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता”
भाजपने कितीही आदळआपट केली तरी महाविकास आघाडी भक्कम- संजय राऊत