मुंबई : वेळ आली तर शिवसेना भवन देखील फोडू, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलं होतं. यावरुन शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दीली आहे.
वेळ आली तर सेना भवन फोडू असं प्रसाद लाड म्हणाले, आपण काय म्हणाल?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर संजय राऊत यांनी ‘आमचे शाखाप्रमुख बोलतील’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही. शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?, असं म्हणत समझनेवालोंको इशारा काफी है, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर
बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..)
शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे.
बाटगयांना हे कसे समजणार?— Sanjay Raut (@rautsanjay61) August 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”
“राज्यातील बारावी परीक्षांचा निकाल उद्या 2 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता”
भाजपने कितीही आदळआपट केली तरी महाविकास आघाडी भक्कम- संजय राऊत
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली- गिरीश महाजन