Home महाराष्ट्र “केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”

“केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावं लागल्याने बाबुल सुप्रियो यांचा राजकारणाला अलविदा”

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांचादेखील यात समावेश होता. तसेच राजीनामा द्यावा लागल्याने बाबुल सुप्रियो हे नाराज होते, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. यानंतर बाबुल सुप्रियो यांनी फेसबुक पोस्ट करत आपण राजकारणाला कायमचा अलविदा करत असल्याचं म्हटलं आहे.

मला समाजकार्य करण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षात राहण्याची अथवा पदाची गरज नसल्याचं बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे. तसेच आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचंही बाबुल सुप्रियो यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, राजकारणातून बाहेर पडत असलो तरीही भाजपच्या विचारधारेशी बांधील राहू, तसेच भाजप पक्षश्रेष्ठी माझा निर्णय समजून घेतील, असं देखील बाबुल सुप्रियो यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यातील बारावी परीक्षांचा निकाल उद्या 2 ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता”

भाजपने कितीही आदळआपट केली तरी महाविकास आघाडी भक्कम- संजय राऊत

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी पूरग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली- गिरीश महाजन

“थांब रे, मध्ये बोलू नको”, नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया; म्हणाले…