“सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटलेत; राष्ट्रवादीचा पलटवार

0
423

मुंबई : शरद पवार बसलेच होते 5 वर्षे उपाशी असल्यासारखे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना प्रत्यृत्तर दिलं आहे.

सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटील काहीही बरळत सुटले आहेत. सत्ता गेल्याचं सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर चंद्रकांत पाटील यांना, असं ट्विट करत शशिकांत शिंदे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

चंद्रकांत पाटील यांनी पवार साहेबांच्या बद्दल वेडी विधाने करणे थांबवावे अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शटडाऊन टाळायचं असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी- उद्धव ठाकरे

आम्ही उपाशी आहोत की नाही हे जनता ठरवेल, तुम्ही मात्र नेहमीच कुपोषित दिसताय- रुपाली चाकणकर

“मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी 40 गोष्टी लिहल्या आणि 38 गोष्टी पूर्णही केल्या”

मागचे 5 वर्षे शरद पवार बसलेच होते उपाशी असल्यासारखे- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here