Home महाराष्ट्र मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी! पूरग्रस्त भागात वीजबिल वसुली करु नका; ऊर्जामंत्र्यांचे आदेश

मुंबई : मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासाह कोकणातही पुराचा फटका बसला आहे. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना ठाकरे सरकारने दिलासा दिला आहे. पूरग्रस्त भागात  वीजवसुली न करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिली आहे.

आम्ही पूरग्रस्त भागात वीजवसुली करु नये असे आदेश दिले आहेत. या ठिकाणी वसुली होणार नाही. परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर वीजबिलंदेखील दिली जाणार नाहीत. लोकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. परिस्थिती निवळल्यानंतर वीज बिल देत असतानाही कितपत दिलासा देऊ शकतो याचा विचार समिती करत आहे, असं नितीन राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, नितीन राऊत यांनी यावेळी वीजबिल माफ करण्यासंबंधंचा निर्णय मंत्रिमंडळाकडे असल्याचंही नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

गप्पा पुरोगामीपणाचा आणि काम अंधश्रध्दा वाढविण्याचं; केशव उपाध्येंची राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच निधन

अनिल देशमुख यांना अटक आता नक्की होणार- किरीट सोमय्या

“नारायण राणेंचं तोंड गप्प करण्यासाठी आमचा एक शिवसैनिकच पुरेसा”