Home महाराष्ट्र अनिल देशमुख यांना अटक आता नक्की होणार- किरीट सोमय्या

अनिल देशमुख यांना अटक आता नक्की होणार- किरीट सोमय्या

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधलाय.

अनिल देशमुख यांना अटकेपासून संरक्षण देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मला खात्री आहे की ज्या क्षणी अनिल देशमुख अज्ञातवास” मधून बाहेर पडतील, त्या क्षणी सीबीआय आणि ईडी त्यांना अटक करतील, असं  किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ईडीनं अनिल देशमुख यांना सोमवारी 2 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. याशिवाय अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांना देखील समन्स बजावण्यात आले आहे. तर दुसरीकडे ईडीकडून अटक होऊ नये यासाठी देशमुखांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. मात्र अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा मिळाला नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंचं तोंड गप्प करण्यासाठी आमचा एक शिवसैनिकच पुरेसा”

पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

“टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”

मदत म्हणा किंवा पॅकेज म्हणा पण तात्काळ घोषणा करा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला