सातारा : चिपळूण दौऱ्यात अधिकारी उपस्थित नसल्यानं भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला. व्यापाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची शाळाच घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला. यावर शिवसेना नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, असा इशारा शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.
दरम्यान, तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथं कोण आहे? इथं तुमचा एक तरी अधिकारी आहे का? आतापर्यंत तुम्हाला स्वस्थ बसू दिलं, आता जागेवर बसू देणार नाही हे लक्षात ठेवा, असं नारायण राणेंनी म्हटलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
पुण्यातील निर्बंधामध्ये सूट देण्याची चर्चा, 1-2 दिवसात निर्णय होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
“टीम इंडियाच्या अडचणीत वाढ, कृणाल पांड्यानंतर आणखी 2 खेळाडूंना कोरोनाची बाधा”
मदत म्हणा किंवा पॅकेज म्हणा पण तात्काळ घोषणा करा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा योग्य मान सन्मान केला जाईल; गुलाबराव पाटलांची थेट ऑफर