कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांसाठी सरकराने भरीव मदतीचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय.
कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नसून मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे, असं म्हटलं होतं.
आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे. आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडेंनी शिवसेनेत प्रवेश केल्यास त्यांचा योग्य मान सन्मान केला जाईल; गुलाबराव पाटलांची थेट ऑफर
‘या लोकांना महत्व देण्याची गरज नाही’; आमदार रोहित पवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर
पूर संरक्षक भिंत चीनच्या भिंतीसारखी सरसकट बांधता येणार नाही; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला
“कोल्हापुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस पाहणी करत असताना एकमेकांना समोरासमोर भेटले”