कोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी करत आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही आज पुरग्रस्त कोल्हापूर दाैऱ्यावर आहेत.
दोन्ही नेते कोल्हापुरच्या पुरग्रस्त शाहुपुरीची पहाणी करत असताना एकमेकांसमोर आले, दोघेही भेटले आणि बोललेही. तसेच राज्यातील दोन टॉपचे नेते असे अचानक भेटल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस कळालं की, फडणवीसही त्याच भागात पहाणी करतायत, त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना शाहुपुरीतच थांबण्याचा निरोप दिला. हवं तर वेगवेगळी पहाणी करण्यापेक्षा, एकत्र पहाणी करु असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनीही मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान दिला व ते शाहुपुरीतच थांबले आणि दोघांची भेट अशा पद्धतीनं झाल्याचं कळतंय.
महत्वाच्या घडामोडी –
“…तर त्यांचे हातपाय तोडू, हा महाराष्ट्र आहे, इथं फक्त राज ठाकरेंचं राज चालतं”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल; शिरोळ, नृसिंहवाडीत पूरस्थितीची केली पाहणी
“बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आहे तो, मुख्यमंत्री आमच्या मागण्या नक्की पूर्ण करतील”
“मोदींच्या सूचनेमुळे नितीन गडकरींनी घेतली शरद पवार यांची भेट; गुप्त भेटीमुळे चर्चांना उधाण”