रत्नागिरी : शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज चिपळूणला भेट देत पूरपरिस्थितीची पाहणी केली. चिपळूणमधील पुरग्रस्तांचे हाल बघताना उर्मिला मातोंडकर यांनाअश्रू अनावर झाले.
उर्मिला मातोंडकर यांचा अक्षरशः रडायला लागल्या. त्या म्हणाल्या, आताची परिस्थिती बघता, कोणाचाही धीर सुटेल अशी अवस्था झाली आहे. तुम्ही दाखवलेल्या परिस्थितीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. मी प्रार्थना करते, माध्यमांमुळे लोक इथे मदतीसाठी पोहोचतील. हे घर खरोखरच आतमध्ये आहे. कशी मदत पोहोचणार माहिती नाही. मला विश्वास आहे, परमेश्वराने त्यांना वाचवलं, तर परमेश्वराला काळजी असेल, नक्की पुढची मदत होईल, असं उर्मीलाS मातोंडकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मी स्वत: नेता नाही, पण आश्वासन दिले आहे. माझ्या परीने जी मदत होईल ती पूर्ण करेन, अजून काय करु. कोणी तरी पुढाकार घेऊन मदत करणे गरजेचे आहे, तीच मदत घेऊन मी आले, असं म्हणत उर्मिला मातोंडकर रडायला लागल्या.
महत्वाच्या घडामोडी –
BREAKING NEWS! जयंत पाटील ब्रीच कँडी रूग्णालयात; अस्वस्थ वाटू लागल्याने मंत्रिमंडळ बैठक अर्धवट सोडली
“शरद पवारांना बाहेरचे सोडा, घरचे लोक देखील गांभीर्याने घेत नसतील”
सांगलीत आलेल्या महापुरा साठी ‘मराठा बिझनेस असोसिएशन’ द्वारे स्वच्छता मिशन व फिनेल वाटप
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार; केशव उपाध्येंकडून ‘हे’ 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित