Home महाराष्ट्र आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार; केशव उपाध्येंकडून ‘हे’ 3 महत्त्वाचे मुद्दे...

आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार; केशव उपाध्येंकडून ‘हे’ 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. तसेच सरकारकडून आज दरड दुर्घटनाग्रस्तांसाठी मोठ्या पॅकेजच्या घोषणेची शक्यता आहे. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली.

आज ठाकरे मंत्रीमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री #workFromHome करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी यावेळी केली.

मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा., असं केशव उपाध्येंनी म्हटलं.

मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी व दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी, असंही केशव उपाध्येंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…यावरून कळतं की, या सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे; निलेश राणे

“भाजपसोबत युती नाही, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार”

“शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण”

‘ए तु थांब रे…मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच दरेकरांना झापलं; पहा व्हिडिओ