नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट झाल्यानंतर मनसे-भाजप युती होणार, अशी चर्चा सूरू होती. यावर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार आहे. सध्या तरी आमच्याकडे कुणाकडूनही युतीचा प्रस्ताव आलेला नाही, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे यांनी नाशिकचं मनापासून संगोपन केलं आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा संगम घडवून पुन्हा एकदा आम्ही नाशिकमध्ये कमबॅक करणार आहोत, असं संदीप देशपांडेंनी यावेळी म्हटलं.
मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे नाशिकमध्ये कमबॅक करेल. गेल्या 5 वर्षात नाशिककरांची पुरती निराशा झाली आहे. दत्तक घेऊ ही योजनाही फेल गेली आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी भाजपला टोला लगावला आहे.
दरम्यान, संदीप देशपांडे आणि अमित ठाकरे हे आज नाशिकच्या 2 दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. तेंव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवार विरोधी पक्षाचे भीष्म पितामह, ममता बॅनर्जी राष्ट्रीय राजकारणाचं आकर्षण”
‘ए तु थांब रे…मध्ये बोलू नको, नारायण राणेंनी फडणवीसांसमोरच दरेकरांना झापलं; पहा व्हिडिओ
पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त- गोपीचंद पडळकर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार”