मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी 3 दिवसांपुर्वी चिपळूण दौरा केला होता. यात त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
नारायण राणे हे प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पूरग्रस्त चिपळूणची पाहणी करत असताना हा प्रकार घडला. पूरग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू असताना तुम्ही दात काढता, ऑफिसमध्ये काय करता, तिथे का नाही आलात, असे प्रश्न विचारत राणे अधिकाऱ्यांना झापत होते.
तुम्हाला सोडू का? तुम्हाला माॅबमध्ये सोडू का ? असा सवाल नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावेळी प्रविण दरेकर मध्ये काहीतरी बोलले. त्यावर नारायण राणे यांनी दरेकरांना झापलं. ‘ए तु थांब रे…! मध्ये बोलू नको, असं नारायण राणे दरेकरांना म्हणाले. तसेच इथं काय करताय. इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे, असंही राणेंनी अधिकाऱ्यांना म्हटलं.
दरम्यान, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडीओ शुट केला आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस देखील दिसत आहेत.
ए तू थांब रे………मध्ये बोलू नको
राणे नी झापलं राव
घोर अपमान BC pic.twitter.com/UdDdPcHjvs— Adv Anand Dasa (@Anand_Dasa88) July 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे सरकार ‘खुर्ची बचाव’ कार्यात व्यस्त- गोपीचंद पडळकर
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार”
“परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन”
पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल- अजित पवार