मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर चिपळूण, महाड, सांगली, कोल्हापुरातील महापुरामुळं झालेलं नुकसान न भरून येणारं आहे. यावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता.. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा.., असं आवाहन गोपीचंद पडळकरांनी यावेळी केली.
पुरग्रस्तांना वाऱ्यावर सोडून हे ‘सरकार खुर्ची बचाव’कार्यात व्यस्त आहे.. पूरग्रस्त शेतकरी, नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना कुठल्याही निकषात न अडकवता.. तातडीनं प्रत्येकी १ लाखाची मदत करा आणि व्यापाऱ्यांना पुढील दोन वर्षासाठी घरपट्टी,पाणीपट्टी,वीजबील माफ करा..@CMOMaharashtra pic.twitter.com/JNak2hT7RC
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) July 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार”
“परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन”
पूरग्रस्तांना उभं करण्याचं काम राज्य शासन करेल- अजित पवार
…तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले