Home महाराष्ट्र …तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले

…तर कोश्यारींनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा- नाना पटोले

मुंबई : 26 जुलै रोजी कारगिल दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात राज्यपालांनी पंडित जवाहरलाल नेहरूंवरून केलेल्या एका विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र आक्षेप घेत राज्यपालांना कडक शब्दांमध्ये सुनावलं आहे.

राज्यपालपदावर असतानाही त्यांना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी राज्यपालपदाचा राजीनामा द्यावा आणि नंतर राजकीय वक्तव्ये करावीत. राज्यपालपद हे प्रतिष्ठेचे पद आहे त्यापदावर असलेल्या व्यक्तीने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवला पाहिजे परंतु त्यांच्या वर्तनातून ते दिसत नाही. उलट त्यांचे वर्तन हे राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहमंत्रालयाने कोश्यारी यांना परत बोलावावे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

राज्यपाल म्हणून जी कार्य करायची आहेत ती सोडून कोश्यारी इतर कार्यातच जास्त रस घेताना दिसतात. राज्यपाल हा कोणत्याच पक्षाचा नसतो तो राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो. परंतु कोश्यारी यांनी राजभवनला भारतीय जनता पक्षाचे कार्यालयच बनवले आहे.त्यांनी आतापर्यंत केलेली विधाने त्यांच्या विशिष्ट राजकीय विचारधारेतुनच आलेली आहेत. ते नेहमी सरकारविरोधात आणि भाजपाधार्जिणे काम करत आले आहेत. कोश्यारी यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झालेले आहेत, त्या संस्कारातून ते राज्यपाल पदावर असतानाही बाहेर आलेले दिसत नाहीत, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

इतकं खोटं बोलणारं सरकार जगाच्या नकाशावर नसेल; निलेश राणेंचा घणाघात

पर्यटन दौरा संबोधून लोकशाहीची थट्टा करणे योग्य नाही- प्रविण दरेकर

जनतेच्या आक्रोशामुळे शिवसेना हादरुन गेली, त्यामुळेच…; नारायण राणेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं, पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही, असं संजय राऊतांना वाटतं- देवेंद्र फडणवीस