Home महाराष्ट्र शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…

शरद पवार म्हणाले दौरे टाळा; अतुल भातखळकर, म्हणतात…

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांना पूरग्रस्त भागातले दौरे टाळण्याचं आवाहन केलं होतं. यावरुन भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

“आपण करायचे नाही, इतरांना करू द्यायचे असा ठाकरे सरकारचा खाक्या आहे. संकटाच्या काळातही राजकारण सुटत नाही. बिघडलेला रिमोटही याला अपवाद नाही. कोकणात भाजपा नेते पोहोचले तेव्हा प्रशासनाचा गाडा हलला. असं अतुल भातखळकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा,असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण, आजचा दुसरा टी-20 सामना रद्द”

“ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले”

राज्यपालांनी भाजप आमदाराला सोबत घेऊन दाैरा करणं, हे कितपत योग्य?; अमोल मिटकरींचा सवाल

पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार