मुंबई : नेत्यांनी पूरस्थिती असलेल्या भागात पर्यटन टाळावे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होत, यावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
प्रशासनाने तळीयेच्या दुर्घटनेवेळी तत्परतेने मदत केली असती तर खूप जणांचे प्राण वाचू शकले असते, असं म्हणत सर्वज्ञानी असलेले शिवसेना नेते संजय राऊत आपल्या सवयीप्रमाणे परत एकदा आपल्या ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणावर पांघरून घालण्यासाठी विरोधक व केंद्रावर दोषारोप करून मोकळे झाले आहेत, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
भाजपचे नेते प्रवीण दरेकर व वृत्तवाहिन्या त्या ठिकाणी आधी पोहचल्या, तेथील नागरिकांनीच 39 मृतदेह बाहेर काढले आणि त्यानंतर 16 तासाने प्रशासन अवतरले. ज्यावेळेस आपण प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणालाच प्राधान्य देतो, तेंव्हा होतकरू प्रशासकीय अधिकारी बाजूला सारले जातात व सरकार पंगु होते. ठाकरे सरकारच्या गेल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात अशा दुर्घटनांमधे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अनेकांना जीव गमवावे लागले. संजय राऊत यांनी यानंतर सुद्धा बदलीच्या अर्थकारणालाच प्राधान्य देणे म्हणजेच ‘मढ्यावरचे लोणी खाणे’ असा प्रकार आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
राज्यपालांनी भाजप आमदाराला सोबत घेऊन दाैरा करणं, हे कितपत योग्य?; अमोल मिटकरींचा सवाल
पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार
“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी साकार करावं”