सांगली : केंद्रीय मंत्री नारायण राणे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी रविवारी चिपळूण दौऱ्या होते. यावेळी अधिकारी उपस्थित नसल्यानं नारायण राणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन संताप व्यक्त केला होता. राणेंच्या या संतापाची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बरेच जण दौरे करत आहेत, केंद्र सरकारचे मंत्री येत आहेत. तो त्यांचा अधिकार आहे सरकारच्याबाजूचे लोकं मदतीसाठी प्रयत्न करतील. पण, यापुढे जिल्हाधिकारी यांना वेळ मिळावा म्हणून नोडल ऑफिसर नेमण्यात येणार आहेत. या पाहणी दौऱ्यातील मंत्र्यांसोबत, नेत्यांसोबत नोडल ऑफिसर फिरेल. बाकीचे सर्व सनदी अधिकारी आपल्या कार्यालयातून कामकाज बघतील, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
प्रत्येकजण इथं येऊन, तू कशाला इकडे गेला, तू कशाला तिकडे गेला… अरे कशाला गेला.. कशाला गेला… म्हणजे. व्हीव्हीआयपींच्या दौऱ्याचा तो प्रोटोकॉल आहे, त्यानुसार त्यांना तेथे जावंच लागतं. उद्यापासून अजून दौरे वाढतील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या निर्णयाला सहमती दिली आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडून पंकजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा; पंकजा म्हणाल्या, ‘भेटलं पाहिजे’
“नारायणे राणे केंद्रीय मंत्री झाले आणि कोकणावर संकट आलं, राणेच पांढऱ्या पायाचे आहेत”
ठाकरे सरकारनं पूरग्रस्त भागातील जनतेच्या भावनांची कुचेष्टा केली- केशव उपाध्ये
मुख्यमंत्र्यांचे पाय पांढरे आहेत का, हे एकदा पहावं लागेल- नारायण राणे