मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. या पावसामुळे कोकणवासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी महिलेसोबत गैरवर्तन केलं. यानंतर या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यावर भाजप नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
मी सांगितले होते की, हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे!! तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला. अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्या मुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते?, असा हल्लाबोल नितेश राणेंनी यावेळी केला.
मी सांगितले होते की,
हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे!!
तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला.
अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्या मुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते? pic.twitter.com/ZhoRgu8Mzc— nitesh rane (@NiteshNRane) July 25, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माणिकराव जगताप यांचं निधन”
पूरग्रस्तांना तातडीची 10 हजारांची मदत; राज्य सरकारची मोठी घोषणा