मुंबई : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात महापूरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना राज्य सरकार तातडीने मदत करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी पूरग्रस्त चिपळूणची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी तातडीने मदत केली जाईल, असं आश्वासन दिलं होतं. यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरडग्रस्तांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराने थैमान घातलं आहे. या भागांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. दरडग्रस्तांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेल. तसेच ज्या नागरिकांच्या घरांना पुराचा फटका बसला आहे अशा कुटुंबांना तातडीने 10 हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला आहे. पात्र लोकांची यादी महिन्याभरात तयार होईल. जे बाधित आहेत त्यांना जमीन दिली जाईल. त्यांचं एका वर्षाच्या आत पुनर्वसनाचं काम केलं जाईल, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
कृष्णेची पातळी कमी होत आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल- जयंत पाटील
सांगलीकराना दिलासा; कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरण्यास सुरवात