मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सांगली, सातारा, कोल्हापूरला पावसाने चांगलंच झोडपलं आहे. तसेच या 3 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूर, सांगली भागात पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा राज्य सरकारने तातडीने पाऊले टाकण्याची गरज आहे. अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी सतत पाठपुरावा करून समन्वय स्थापित केला पाहिजे., असा सल्ला फडणवीसांनी यावेळी दिला.
कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा., असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
कर्नाटकच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने नंतर हा विसर्ग योग्य दाबाने होण्यात अडचणी निर्माण होतात आणि कोल्हापूर व सांगलीच्या भागात पाणी पातळी वाढत जाते. त्यामुळे आताच अधिकचा विसर्ग कसा करता येईल, याचा प्रयत्न करावा.#MaharashtraFloods #floods #Kolhapur
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 24, 2021
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांचा महाड दाैरा म्हणजे वराती मागून घोडे; प्रवीण दरेकरांचा घणाघात
सांगली जिल्ह्याला पुराचा फटका, मात्र सुदैवानं 2019 सारखी परिस्थिती नाही- विश्वजित कदम
सरकारतर्फे संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल; महाड दाैऱ्यात मुख्यमंत्र्यांचं गावकऱ्यांना आश्वासन
जनता पुरात, पालकमंत्री मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल