मुंबई : राज्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोरदार तडाखा लावलेला आहे. राज्यातील अनेक भागात पूर आला असून अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी महाडमधील तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी केली. यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला.
सरकारतर्फे गावकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल तसेच त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच गावकऱ्यांनी काळजी करू नये, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी गावकऱ्यांना दिलासा दिला.
डोंगर उतारावरील सर्व वस्त्यांचे पुनर्वसन केले जाणार असून आवश्यक ती सर्व मदत केली जाणार असल्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
महत्वाच्या घडामोडी –
जनता पुरात, पालकमंत्री मुंबईत, हे पालकमंत्री नव्हे, हे पळपुटे मंत्री; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सांगलीकराना मिळणार दिलासा; कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होण्याची शक्यता
महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचंही लक्ष- देवेंद्र फडणवीस
“राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं”